वेंगुर्ले शहरात दहीहंडी उत्सव उत्साहात, बाल गोपाळ गोविंदा पथकाचा थरार…

2

गाडीअड्डा, देऊळवाडा व सातेरी व्यायाम शाळेची मानाची दहीहंडी फोडून जल्लोष

वेंगुर्ले ता.१९: शहरात “गोविंदा रे गोपाळा” च्या जयघोषात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवात बाल गोपाळ गोविंदा पथकाचा थरार पाहायला मिळाला. शहरातील गाडीअड्डा, देऊळवाडा व सातेरी व्यायाम शाळेची मानाची दहीहंडी फोडून सर्वांनी जल्लोष केला.
वेंगुर्ले तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अनेक ठिकाणी घरोघरी साजरा केला जातो. आज या उत्सवाचा दहीकला करून आणि श्रीकृष्णाच्या मूर्तींचे विसर्जन करून समारोप करण्यात आला. वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ले शाळा नंबर 1 या शाळेतही गेले काही वर्षांपासून श्रीकृष्णाची वाजत गाजत मूर्ति आणून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षीही विद्यार्थी पालक व शिक्षक माजी विद्यार्थी यांनी मिळून उत्सव साजरा केला.
तालुक्यात काही ठिकाणी बालगोपाळ एकत्र येऊन दहीहंडी फोडतात. शहरातील गाडी अड्डा येथील मित्रमंडळी कडून दरवर्षी तीन ते चार थरांची दहीहंडी उभारून दहीकाला उत्सव साजरा केला जातो. तसेच देऊळवाडा येथेही नागरिक एकत्र येऊन दहीहंडी फोडतात. तर सातेरी व्यायाम शाळा येथेही संचालक किशोर सोनसुरकर सर्व सहकारी व्यायामपटू व बच्चे कंपनी नागरिकांना एकत्र करून दहीहंडी उत्सव साजरा करतात. या तीन्ही ठिकाणी यावर्षी सर्वांनी मिळून मानाची दहीहंडी फोडली. या उत्सवात वेंगुर्लेवासीय ही सहभागी झाले होते.

76

4