दोडामार्ग-झोळंबे येथे बांधावरची शाळा हा उपक्रम उत्साहात साजरा

644
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता.०९: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित “बळीराजा साठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झोळंबे या शाळेत बांधावरची शाळा हा उपक्रम उत्साहात साजरा केला.झोळंबे येथील प्रगतशील शेतकरी वसंत लक्ष्मण गवस यांच्या शेतात मुलांनी शेतीच्या कामाचा आनंद अनुभवला.
बांधावरची शाळा उपक्रमा वेळी जि.प सदस्य संपदा देसाई,प.स सदस्य धनश्री गवस, गणेश प्रसाद गवस,झोळंबे सरपंच राजेश गवस,पोलीस पाटील संजय गवस,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी गवस,मुख्याध्यापक यशवंत धुरी, यशवंत गवस देवेंद्र गवस प्रमोद गवस प्रकाश गवस आदी उपस्थित होते.
शेतकरी श्री वसंत गवस यांच्या बरोबर मुलांनी संवाद साधला शेती करताना करावी लागणारी विविध कामे जमिनीची मशागत पेरणी तरवा काढणे तर वा लावणे चिखल करणे नांगरणी बांधावर माती घेणे यासारख्या कामांची माहिती मिळवली शेती कामासाठी लागणारी हत्यारे कुदळ-फावडे या विषयी सर्व माहिती करून घेतली.

\