आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा मोटार चालक -मालक संघटनेचा पाठिंबा…

293
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.०९: आ. नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेक आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा मोटर मालक चालक वहातुक संघटनेचा पुर्ण पाठिंबा आहे. असे संघटनेचे अध्यक्ष गिरीधर रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे. दि. ७ जुलै रोजी कुडाळ तेरसेबांबर्डे याठिकाणी ट्रकला अपघात होवून संदिप अनिल बाराले हा ट्रकमालक मृत्युमुखी पडला. त्याला संघटनेच्या वतीने आम्ही श्रध्दांजली वाहत आहोत. तर या अपघातात कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या ठेकेदार व संबंधित अधिकारी प्रकाश शेडेकर यांचा संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. त्यांच्या हलगर्जी कारभारामुळे या चालकाला प्राणाला मुकावे लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आता अपघातास कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करणार याची आम्ही वाट बघत आहोत. असे प्रसिध्दीपत्रकात रावराणे यांनी म्हटले.
मुंबई गोवा हायवे चौपदरी करण कामाच्या दुरावस्थेला सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांना सत्तेचा माज चढला आहे. म्हणूनच ते जनहिताच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने अधिकारी मोकाट आहेत. लोकसेवकाची भूमिका अधिकारी पार पाडत नाहीत. म्हणूनच जनतेची बाजू मांडण्यासाठी आ. नितेश राणे यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यातून घडलेला प्रकार म्हणजे जनतेच्या वास्तव भावना आहेत. आंदोलन करणा-या आ. नितेश राणे यांना जाचक कलमे लावून कोठडीत टाकण्याचा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. या रस्त्यावरून आम्ही रात्रदिवस वाहतूक करत आहोत. रस्त्याची परिस्थिती पहाता प्रशासन आमच्या जीवाशी खेळत आहे असे निवेदनात गिरीधर रावराणे यांनी म्हटले आहे. आ. राणे यांनी आमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या आंदोलना बिनशर्त पाठिंबा असे रावराणे म्हटले आहे. संघटनेचे सचिव श्री विजय वालावलकर, खजिनदार राजन बोभाटे व सर्व सभासद, जिल्ह्यातील तमाम ट्रक, डंपर, टेम्पो, मालक -चालक यांचा आ. नितेश राणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असे प्रसिध्दीपत्रकात गिरीधर रावराणे यांनी म्हटले आहे.

फोटो- गिरीधर रावराणे.

\