झोळंबे येथे काथ्यापासुन दोरी निर्मिती प्रशिक्षण

220
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग : चांदा ते बांदा पथदर्शी योजनेअंतर्गत महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ द्वारे व काथ्या उद्योग सामूहिक सुविधा केंद्र झोळंबे तालुका दोडामार्ग झोळंबे येथे काथ्या दोरी निर्मिती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा उद्घाटन सोहळा जि प सदस्या संपदा देसाई पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांच्या उपस्थितीत पार पडला.
हा कार्यक्रम एक महिना कालावधीचा असून सहभागी महिलांना प्रमाणपत्र व विद्यावेतन देण्यात येणार आहे तसेच काथ्या दोरी तयार करण्याचे यंत्रही देण्यात येणार आहे. मागील प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना काथ्या दोरी तयार करण्याची यंत्र संपदा देसाई धनश्री गवस व सरपंच राजेश गवस गणेश प्रसाद गवस यांच्या मार्फत वितरीत करण्यात आली.
महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी काथ्या व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यावे व स्वयंपूर्ण बनावे असे आवाहन धनश्री गवस यांनी केले तर आपल्या गावात जी काथ्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू असतील त्यांची ओळख झोळंबे तील काथ्याची खास वस्तू अशी व्हावी यासाठी प्रशिक्षणात पूर्ण तन्मयतेने सहभागी व्हा असे उद्गार जि प सदस्य संपदा देसाई यांनी काढले. तर सरपंच राजेश गवस यांनी पालकमंत्री दीपक केसरकर गणेश प्रसाद गवस यांनी या व्यवसायाची मुळे झोळंबे गावात रोवून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हा समन्वयक श्री शंकर सावंत तसेच ग्रा.पं सदस्य व या कार्यक्रमाच्या प्रशिक्षिका सौ गवत तसेच प्रशिक्षणार्थी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.