दारू वाहतुक, विक्री मागे झारीतील शुक्राचार्य खात्यातीलच : महेश सारंग यांचा आरोप

2

बावनकुळे यांच्याकडे कारवाईची मागणी

सावंतवाडी,ता.०९ :सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होण्यामागे खात्यातील काही अधिकारी व कर्मचारी असल्याचे समजते त्यामुळे अशा लोकांवर तात्काळ कारवाई करून बेकायदा दारू वाहतूक व विक्रीवर आळा घाला अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की जिल्ह्यात गोवा राज्याच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारूची वाहतूक सुरू आहे. त्या दारूची विक्री ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. याचा त्रास नाहक तरुण पिढी सोबत कुटुंबाला सहन करावा लागत आहे अनेक लोक मृत्युमुखी पडले.विशेष म्हणजे पोलिस खात्यातील काही अधिकारी व कर्मचारी या धंद्यांच्या पाठीशी असल्याचा संशय आहे. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता या धंद्यावर तात्काळ आळा घालण्यात यावा अशा प्रकारचे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावेत अशी मागणी या निवेदनात श्री सारंग यांनी केली आहे.

15

4