२७ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…
सावंतवाडी ता.०९: सह्याद्री फाउंडेशन तर्फे दरवर्षी घेण्यात येणारा वर्षा ऋतूतील मान्सून महोत्सव २०१९ हा यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले आहे.२७ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत सावंतवाडीत हा महोत्सव होणार आहे.या महोत्सवात शैक्षणिक ,सांस्कृती,क्रीडा,कृषी,रानभाज्या,पोहणे,वकृत्व,निबंध,चित्रकला,सायकलिंग,नाट्य आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जवळपास वीस दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पर्यावरण विषयक कार्यक्रम आहे हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजू परब व संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी संस्थेचे सचिव एडवोकेट संतोष सावंत माजी सभापती रवींद्र वडगावकर प्रल्हाद तावडे सुहास सावंत माजी सभापती प्रमोद सावंत हर्षवर्धन धारणकर आदी उपस्थित होते श्री परब म्हणाले यंदाचा महोत्सव वेगळ्या पद्धतीत घेण्यात येणार आहे दरवर्षी पाच दिवस चालणारा महोत्सव यंदा वीस दिवस कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धती घेतले जाणार आहेत सर्व स्तरांतील घटकांना व तरुण-तरुणींना शैक्षणिक दृष्ट्या विकसित करण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
शैक्षणिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर गाईड च्या उपक्रमाद्वारे महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे 27 जुलैला दहावी व बारावी नंतर पुढे काय आर्मी व शासकीय नोकरी बाबतचे मार्गदर्शन व करिअर गाईड व गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे 27 जुलैला महोत्सव शुभारंभ झाल्यानंतर पर्यावरण विषयक उपक्रम वृक्ष चळवळ गावागावात राबवण्यात येणार आहे त्यानंतर 10 ऑगस्ट 18 ऑगस्ट या कालावधीत निबंध वक्तृत्व चित्रकला मोती तलावात पोहणे स्पर्धा सायकलींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे 10 ऑगस्टला रानभाज्या स्पर्धा व प्रदर्शन व कृषी विषयक मार्गदर्शन होणार आहे या स्पर्धेमध्ये महोत्सवात कॅरम बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे 18 ऑगस्टला महोत्सव समारोप होणार आहे करियर गायड स बाबत मुंबईतील शिक्षण तज्ञ प्रचार करण्यात आले आहेत तरी या महोत्सवात सर्व शाळा महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी प्रल्हाद तावडे सैनिक पतसंस्था सावंतवाडी शहर शाखा व सचिव एडवोकेट संतोष सावंत यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे