वेंगुर्लेतील मयत व्यक्तीच्या दहनासाठी नगरपरिषद मोफत लाकूड समान पुरविणार :विशेष सभेत निर्णय

263
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले, ता.९ :वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील नागरीक मयत झाल्यास व त्याला नगरपरिषद हद्दीतील स्मशानभुमीमध्ये दहन केल्यास दहानास लागणारे लाकूड सामान मोफत पुरविण्याचा निर्णय आज झालेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. तसेच स्मशानभूमीत चांगली सुविधा करण्याचे ठरविण्यात आले.
वेंगुर्ले नगरपरिषदेची विशेष सभा मंगळवारी न. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेविका कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, कृपा गिरप, शितल आंगचेकर, सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, शैलेश गावडे, पूनम जाधव, आत्माराम सोकटे, मुख्याधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते. या निर्णया बरोबरच अन्य विषयावरही चर्चा झाली.
वेंगुर्ले न. प. ने गतवर्षी स्वच्छता नेत्र ऍप सुरु केले त्याच पुढे काय झाले. असा सवाल नगरसेवक प्रशांत आपटे यांनी उपस्थित करुन २०२० च्या स्वच्छता स्पर्धेत वेंगुर्ले न. प. चा प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रशासनाते जोमाने कामास लागावे. अशी सुचना केली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेवर मास्टर ट्रेनर म्हणुन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच गेले काहि दिवस वेंगुर्ले शहरातील रस्त्यांवरील पालापाचोळा गोळा करुन ठेवला जातो. मात्र तो वेळीच उचलला जात नसल्याचे नगरसेविका श्रेया मयेकर यांनी निदर्शनास आणुन दिले. त्यावर मुख्याधिकारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे ते होत असल्याचे मान्य करुन येत्या दोन दिवसात त्यासंदर्भात कार्यवाहि करण्यात येईल असे सांगितले. यावेळी स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, प्रशांत आपटे, दादा सोकटे, कृतिका कुबल, पुनम जाधव, नागेश गावडे यांनीहि काहि सुचना मांडल्या.

\