चादरीत गुंडाळून टाकला मृतदेह; पोलिसात गुन्हा दाखल;…
पणजी ता.०९: वारपे-पेडणे येथे कृषीखात्याच्या मालकिच्या जागेत पेडणे ते पार्से या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह खून करुन टाकलेल्या अवस्थेत आढळून आला.ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पार्सेच्या बाजूने जात असताना वारपे येथे रस्त्याच्या बाजूला लाल रंगाची बॕडशीट तसेच चादर दिसली. ही चादर नवी कोरी असल्याने संशय आला असता त्यांनी पुढे जाऊन पाहिले तर चादरी जवळ नायलॉन पिवळ्या रंगाची तसेच निळ्या रंगाची दोरी दिसली व एक कंची दिसली.पुढे जाऊन पाहिल्यावर खोल दरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसला याची माहिती लगेच पेडणे पौलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांना देण्यात आली. माहिती देताच लगेच पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक व इतर पोलीस यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन सदर माहिती आपल्या वरिष्ठाना दिला.
पेडणे नगरपालिकेचे नगरसेवक दीपक उर्फ भावला मांद्रेकर , उद्योजक प्रकाश कांबळी ,रुद्रेश नागवेकर पञकार महादेव गवंडी , प्रशांत धारगळकर यांनी सर्व प्रथम घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली.
पेडणे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. मृत झालेल्या व्यक्तीने अंगावर जीन्स पॕन्ट व करड्या रंगाचे टीशर्ट परिधान केले होते.पॕन्टच्या खिशात,कुठल्याही प्रकारचे ओळख पञ तसेच अन्य कागदपत्रे किंवा पैसे सापडे नाही. त्या व्यक्तीच्या गळ्याला डाग होते. तसेच गळ्यात काळा दोरा होता. त्या व्यक्तीच्या तोंडात काळ्या रंगाचा कपडा कोंबला होता. तसेच दोन चादरी जवळ होत्या .
रस्त्याच्या शेजारी कठाठ्यावर एक लाल रंगाचे ब्लेकेट तसेच एक चादर , नायलॉन पिवळ्या रांगाची दोरी , तसेच निळ्या रंगाची नायलॉन दोरी आणि एक कंच्ची सापडली.
अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह वरपे पेडणे येथे चारचाकी गाडीतून आणून टाकल्याचे गाडीच्या टायरचे रस्त्यावर बाजूला निशाण ठळकपणे दिसून आले .त्यामुळे सदर व्यक्तीचा आगोदर खून करुन मग त्याला गाडीत घालून टाकल्याचा
उतर गोवा पोलीस आधिक्षक चंदन चौधरी , म्हापसा येथील पोलीस उपअधिक्षक , हणजुणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक.. सोबत पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या सोबत घटनास्थळी भेट देऊन संबधीत जागेची व मृतदेहाची पहाणी केली.