शिवणकला सारख्या शिबिराच्या माध्यमातून महिलांनी जीवनमान उंचवावे ; जि.प. सदस्य हरी खोबरेकर…

2

मालवण, ता.९ : महिलांसाठी शिवणकला सारख्या शिबिराचे आयोजन करण्याचे महत्वाचे पाऊल हे मधुरा चोपडेकर यांनी उचलले आहे. महिलांना आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्याच्या एक चांगला उपक्रम राबविला आहे. या शिबिराच्या माध्यमातून महिलांनी रोजगार निर्मिती करत आपले जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी आज देवबाग येथे केले.
लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फॉउंडेशन सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत देवबाग येथे महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन वायरी भूतनाथ पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर यांच्यामार्फत करण्यात आले. शिबिराचे उदघाटन श्री. खोबरेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी महिलांसाठी चांदा ते बांदा योजना अंतर्गत कुक्कुटपालन सारख्या योजनांचे मार्गदर्शन खोबरेकर यांनी केले व या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेतल्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन केले.
यावेळी या शिबिराच्या प्रशिक्षिका मोंडकर, सीआरपी अनुश्री येरागी, ग्रामपंचायत सदस्य सौ. फिलसू फर्नांडिस, महेश सामंत, मकरंद चोपडेकर, सौ. निहिता गांवकर, युवासेना उपविभाग युवा अधिकारी श्रेयस रेवंडकर आदी उपस्थित होते.

2

4