धुरी यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न करु नये…

2

हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव ईनामदार यांचा इशारा…

  1. दोडामार्ग ता.१०: तालुका हेल्पलाइन हा कुठल्याही राजकीय पक्षाची बांधलेला नसून समाजाशी बांधिलकी असणारा लोकशाहीतील स्वतंत्र ग्रुप आहे.तालुक्यात सामाजिक काम करणा-याना व समाजकार्यात अग्रेसर असणा-या येथील हेल्पलाईन सदस्यांना शिवसेनेच्या बाबुराव धुरी यांनी धमकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न करु नये,आम्हाला तालुक्यात काम करायचे.त्यात कुणी आडवे येवू नये.असा इशारा हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव ईनामदार यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री .धुरी यांना दिला.
    पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर शेरोबाजी करण्याचा हेल्पलाईन वरील आरोप चुकीचा आहे.तालुक्याची व्यथा सत्तेतील पालकमंत्री,खासदार यांच्याकडे मांडणार ना, तर व्यथा इतर पक्षाकडे मांडणार का ? असा सवाल उपस्थित केला.प्रश्न.ग्रुपवर मांडलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास कधीही तयार आहोत.वेळ, तारीख, ठिकाण सांगावे आम्ही हजर राहू असे धुरी यांना आव्हान दिले.
    यावेळी प्रकाश गवस, आंनद तळणकर, अमित बिडये, कानु दळवी, कुष्णा दळवी, संजय सातार्डेकर, रविंद्र खडपकर उपस्थित होते

36

4