जिओ ने केलेल्या खोदाईमुळे अपघात थांबता थांबेनाता

2

दोडामार्ग – सुमित दळवी

तिलारी दोडामार्ग महामार्गावर रस्त्यालगत खोदाई करुन जिओ कंपनीची केबल टाकल्याने कृषि काँलेज झरे- आंबेली येथे मोठा चर पडल्याने चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे.भेडशी येथून दोडामार्गच्या दिशेने जात असताना ए.पी. २९ ए. के. ९५९९ ही गाडी थेट जिओ कंपनीच्या अंदागोंदी कामामुळे साईडपट्टी कमकुवत असल्याने रस्त्यांच्या पलिकडे आदळली. गाडीचा दर्शनी भाग आदळल्याने वाहनधारकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते आणी हाच रस्ता अतिशय धोकादायक बनला असुन जिवितास देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.

4