Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभुयारी गटार योजनेच्या पाईपमधून कारंजा... नगरपरिषदेची हीच यशस्वी चाचणी का ?...

भुयारी गटार योजनेच्या पाईपमधून कारंजा… नगरपरिषदेची हीच यशस्वी चाचणी का ? ; माजी नगरसेवक किरण आपटे यांचा सवाल…

मालवण, ता. १० : मालवण नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेचा पहिल्याच पावसात बोजवारा उडाला असून या योजनेच्या पाईपमधून कारंजा उडत असल्याने पालिकेने केलेली यशस्वी चाचणी हीच का? असा प्रश्‍न माजी नगरसेवक किरण आपटे यांनी उपस्थित केला आहे.
नगरपरिषदेच्यावतीने नुकतीच भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर पडलेल्या मुसळधार पावसानंतर देऊळवाडा येथील भुयारी गटार योजनेच्या पाईपलाईनमधून कारंजा उडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या योजनेचा बोजवारा उडाला असल्याची टीका माजी नगरसेवक श्री. आपटे यांनी केली आहे. नगरपरिषदेला खरोखरच भुयारी गटार योजना यशस्वी करायची असेल तर नगराध्यक्षांनी, मुख्याधिकारी व भुयारी गटार योजनेच्या कामगारांनी अमिताभ बच्चन यांचा आखरी रास्ता हा चित्रपट पाहावा. जेणेकरून भुयारी गटार योजना कशी असावी हे समजून येईल असे म्हटले आहे.
नगराध्यक्षांनी याची तत्परतेने दखल न घेतल्यास देऊळवाडा परिसरात वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची दखल न घेतल्यास आणि निकृष्ट बांधकामामुळे वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला नगरपरिषद प्रशासन की ठेकेदार जबाबदार राहणार हे नगराध्यक्षांनी स्पष्ट करावे असेही श्री. आपटे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments