वेंगुर्ले तालुका स्वाभिमान तर्फे निषेध : पोलिसांना निवदेन
वेंगुर्ले ता.१०:
कणकवली येथील आंदोलन प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर राजकिय हेतूने प्रेरीत होऊन आकसाने ३५३ सारखे कलम लावून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आ. राणे यांच्यावर झालेल्या चुकीच्या कारवाईचा आज वेंगर्ले तालुका स्वाभिमान पक्षाच्यावतीने तीव्र शब्दात जाहिर निषेध करण्यात आला आणि या बाबत लेखी निवेदन वेंगुर्ले पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले.
कणकवली श्हरातील व्यापारी व जनता यांच्या तक्रारी वरुन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पहाणी आ. राणे यांनी केली. त्यावेळी नागरीकांना होणारा त्रास त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र या आंदोलनाला सुदबुध्दीने राजकीय हेतुने गंभीर स्वरुप देण्यात आले हे चुकीचे आहे. तसेच आ. राणे यांच्यावर होत असलेली कारवाईही चुकीच्या पध्दतीने असल्याचे नमुद करुन वेंगुर्ले तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने वेंगुर्ले पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाच्या महिला तालुकाअध्यक्षा सौ. सारिका काळसेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. समिधा नाईक, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब, नगरसेविका शितल आंगचेकर, महिला शहरअध्यक्षा सौ. प्रार्थना हळदणकर, शहर अध्यक्ष जयंत मोंडकर यांच्यासह जि.प. सदस्य प्रितेश राऊळ, समिर नाईक, प्रसाद पाटकर, नितिन चव्हाण, भूषण सारंग, वसंत तांडेल, तुषार साळगांवकर, प.स.सदस्य मंगेश कामत, विकी गावडे, पुंडलीक हळदणकर, सायमन आल्मेडा, अमित दाभोलकर, पपन बांदवलकर, यतिन आवळेगावकर, महेश प्रभू, समिर कुडाळकर, महेश घारे, प्रसाद घारे, नारायण कुंभार, विनय रेडकर, निलेश सामंत, नाथा मडवळ, संतोष गावडे, ज्ञानेश्वर केळजी, कमलेश गावडे, वामन भोसले, नगरसेविका कृपा मोंडकर, पुनम जाधव तसेच पपु चिचकर, पप्पु परब, अजित नाईक, बाळ धुरी, राहुल गावडे, अमित गावडे, भाई राणे, संजु प्रभू, सुभाष खानोलकर, नरेश बोवलेकर, प्रणय मिशाळे, प्रणाली खानोलकर, सुनिल सावंत, प्रसाद प्रभू, सौ. अंकिता देसाई, सौ. अरुणा गवंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.