आर्थिक सहकार्याची मागणी: मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन
कुडाळ:10, रत्नागिरी येथील तिवरे धरण फुटल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी मधून मदत देण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व संजय मंडलिक यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे त्यात त्यांनी नुकत्याच झालेल्या या भीषण घटनेत 24 लोक बेपत्ता झाले आहेत त्यातील 21 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत तर या सर्व प्रकारात पंधरा ते वीस लोकांची घरे वाहून गेली आहेत त्यामुळे या सर्वांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्यात यावे असे म्हटले आहे तर या दुर्घटनेमुळे परिसरातील रस्ते शेती रेल्वेचे रूळ आदींचे नुकसान झाले आहे त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता ही व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी योग्य ते प्रयत्न हवेत अशी मागणी केली आहे