Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोळंब पुलाचे काम बोगस सांगणारे स्वाभिमान पदाधिकारी इंजिनिअर आहेत का?...

कोळंब पुलाचे काम बोगस सांगणारे स्वाभिमान पदाधिकारी इंजिनिअर आहेत का?…

आमदारकीची स्वप्ने पडू लागल्यानेच सावंत यांच्याकडून टीका ; शहरप्रमुख बाबी जोगी..

मालवण, ता. १० : कोळंब पुलाचे काम बोगस आहे हे सांगणारे स्वाभिमानचे नेते इंजिनिअर आहेत का? असा प्रश्न करत आमदारकीची स्वप्ने पडू लागल्यामुळेच स्वाभिमानचे अशोक सावंत पालकमंत्री, आमदारांवर टीका करत असल्याची टीका शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केली आहे.
श्री. सावंत यांनी कोळंब पुलासाठी आमदार वैभव नाईक यांनी आठ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून आणल्याचे मान्य केले आहे. जेवढा निधी आमदार नाईक यांनी मतदार संघात आणला तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात आणलेला निधी मागील २५ वर्षाच्या काळात प्राप्त झाला नाही. कोळंब पुलाचे काम हे चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळेच या पुलावरून वाहतूक करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने २० टनापर्यंतची परवानगीही दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संकल्प चित्रमंडळ पूल विभाग कोकण भवन नवी मुंबई यांच्याकडून चाचणी पूर्ण करून पूल वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे असे असताना स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह स्वाभीमानचे अन्य नेते कोळंब पुलाचे काम बोगस झाले असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात हे काम बोगस आहे हे ठरविण्यास स्वाभीमानचे नेते इंजिनिअर आहेत का? या अगोदर काम सुरू असताना ते का गप्प होते? कोळंब पुलाचे श्रेय घेण्यासाठीच स्वाभीमानचे पदाधिकारी आमदार नाईक यांच्यावर टीका करत आहेत. स्वाभीमानच्या पदाधिकार्‍यांचा सध्या विकासकामांच्या निधीवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची टीकाही श्री. जोगी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments