कणकवलीत महामार्गाचे डांबरीकरण सुरू

2

कणकवली, ता.१० : चिखलफेक आंदोलनांनतर जाग आलेल्या हायवे प्रशासनाने अखेर ठेकेदाराच्या माध्यमातून कणकवली शहरातील महामार्गाचे डांबरीकरण सुरू केले आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून शहरात डांबरीकरण सुरू करण्यात आले. त्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरात होत असलेले डांबरीकरण म्हणजे आमदार नीतेश राणेंच्या आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रिया शहरवासीयांतून व्यक्त झाली.

7

4