Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिवसेना नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास सेना स्टाईलने उत्तर देऊ - बाबुराव...

शिवसेना नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास सेना स्टाईलने उत्तर देऊ – बाबुराव धुरी

दोडामार्ग,10: – सुमित दळवी

युती शासन तसेच पालकमंत्री दीपक भाई केसरकर व विनायक राऊत यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होत असताना काही मंडळी डोळ्याला पट्टी बांधून नाहक बदनामी शिवसेना नेत्यांची करत आहेत. ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही आपणाला जर विकासावर चर्चा करायची असेल तर जागा व वेळ ज्यांना विकास दिसलाच नाही त्यांनी ठरवावी. तुम्ही जिथे बोलवाल त्यावेळी मी स्वतः हजर राहतो जागा व वेळ मी ठरवण्याची गरज नाही. जनतेचा भौगोलिक विकास करणे ही आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पडतो असे बाबुराव धुरी यांनी म्हटले आहे.
आम्हाला दहशत करायची नाही पण जाणून-बुजून शिवसेना नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना जशास तसे सेना स्टाईलने उत्तर देऊ असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले. आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments