शिवसैनिकांचे प्रत्युत्तर:टिका करण्यापेक्षा शहराच्या विकासाकडे लक्ष दया…
सावंतवाडी ता.१०: पालकमंत्री केसरकर यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास कदाचित नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला नसेल,म्हणूनच ते त्यांना वेगळ्या चष्म्यातून बघत असल्याची टीका माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केली.दरम्यान दिपक केसरकर यांनी आपले मंत्रिपद एन्जॉय केले,अशी टीका काल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री.साळगावकर यांनी केली होती,त्यालाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषदेत झाली.
यावेळी राजन पोकळे ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,तालुकाप्रमुख रूपेश रावळ,नगरसेवक तथा शहरप्रमुख बाबू कुडतरकर,शुभांगी सुकी,दिपाली सावंत, माधुरी वाडकर,भारती मोरे,अशोक दळवी ,गजा नाटेकर आदी उपस्थित होते.पोकळे म्हणाले की,सरकारने आपले पद एन्जॉय केले हे म्हणणे चुकीचे आहे.ते आजारी असूनही प्रसंगी प्राथमिक उपचार करून अहोरात्र मेहनत घेत आहेत.त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी पडला हे जरी खरे असले तरी ते जेव्हा जिल्ह्यात येतात त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची जत्रा असते ही वस्तुस्थिती आहे.
केसरकर मंत्री झाल्यापासून नगराध्यक्ष साळगावकर यांनी मुंबईत पाय ठेवला नाही .विकास कामासंदर्भात ते अन्य कोणाला पाठविले असतील तर आपल्याला माहीत नाही मात्र ज्याप्रमाणे ते की सरकारवर टीका करत आहेत ते चुकीचे असून जनता ती कधीही सहन करणार नाही
ज्येष्ठ नगरसेविका लोगो म्हणाल्या की नगराध्यक्ष साळगावकर यांनी केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत आहे आमचा नगरसेवकांचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही तर रुपेश राऊळ यांनी बबन साळगावकर हे सोयीचे राजकारण करत असून त्यांनी पालकमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा शहराच्या विकासावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.