बांदयात घरावर बीएसएनएलचा मनोरा कोसळला

2

बांदा/प्रतिनिधी
मुसळधार पावसाने बांदा शहारातील कट्टा कॉर्नर येथील राजगुरू कॉम्प्लेक्सच्या इमारतीवर उभारण्यात आलेला बीएसएनएलचा १२० मीटर उंचीचा मोबाईल मनोरा अंजुम राजगुरू यांच्या घरावर आज दुपारी कोसळला. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र यामध्ये बीएसएनएल व राजगुरू यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. हा मनोरा वीस वर्षांपूर्वीचा असल्याने गंजून तो कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

4