बळीराजासाठी एक दिवस…

2

जि. प. चा नाविन्यपूर्ण उपक्रम

वैभववाडी ता.१०:‘बांधावरची शाळा’ उपक्रमांतर्गत विद्यामंदिर करुळ गावठण अ प्रशालेतील मुलांनी शेतात शेतीचे धडे गिरवले. शेतकरी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयक माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष शेतीकामाचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी शेतीविषयक गाणी सादर केली.
सदर उपक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक कोलते, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र गुरव, शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सगरे, श्रीम. ताई व्हनाले, श्रीम. पवार, श्रीमती वळंजू, तिर्थराम गुरव, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्याना कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी, भावी पिढी शेतीकडे वळावी, श्रम प्रतिष्ठा मूल्याची रूजवण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गने गत वर्षीपासून शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘बळीराजासाठी एक दिवस’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील एक दिवस प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतकरी जीवनाची अनुभूती देण्यात येते. शेतीच्या विविध पद्धती, शेतीचे प्रकार, शेतीची विविध कामे, शेतीशी संबंधित अवजारे एकूणच कोकणातील पारंपारिक व आधुनिक पद्धतीची शेती व त्या संबंधित संकल्पनांची ओळख करून दिली जाते.

0

4