कणकवलीच्या विद्या प्रभू ठरल्या पहील्या मालवणी साहित्य भूषण पुरस्काराच्या मानकरी

262
2

मुंबई,ता.१० : मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून देण्यात येणारा मालवणी साहित्यभूषण पुरस्कार कणकवली येथील मालवणी लोकसाहित्य संशोधक विद्या प्रभू यांना प्रदान करण्यात आला आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या सहाव्या साहित्य संमेलनात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीच्यावतीने जाहीर करण्यात आला होता.
याप्रसंगी’ वस्त्रहरण’कार मा. गंगाराम गवाणकर, संमेलनाध्यक्ष प्रभाकर भोगले,डाँ, बाळकृष्ण लळीत व भोसले नाँलेज सीटीचे संचालक मा.अच्युत सावंत-भोसले उपस्थित होते.मुळच्या फोंडाघाट (ता. कणकवली) येथे जन्मलेल्या विद्या प्रभू सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर काँलेजच्या मुख्याध्यापिका होत्या. मालवणी बोली,भाषाविज्ञान,लोकसंस्कृती यामध्ये विशेष रूची असणाऱ्या विद्या प्रभू यांनी ‘मालवणीचे संस्कृत भाषेचा जवळचा संबंध कसा आहे हे सिद्ध केले.’मालवणी ही मराठीची एक समृद्ध व चैतन्यपूर्ण बोली आहे.हे त्या आवर्जून सांगतात.त्यांची मालवणी बोलीतील म्हणी,अबोली'( ललितलेख),
शब्दसौरभ, ‘कोकणातील लोककथा आणि गजाली, ही
महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध आहेत.मालवणी बोली भाषेतील वाक्प्रचार व हुमाणी’ हा अत्यंत मौलिक ग्रंथ प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहे.
मालवणी साहित्यभूषण’ पुरस्कार त्यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डाँ, सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.आपण सुमारे ३०/४०वर्षे केलेल्या शोधकार्याची मालवणी बोली संशोधन केंद्र ,सिंधुदुर्ग यांनी दखल घेतल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.भोसले नाँलेज सीटी’चे संचालक मा. अच्युत सावंत-भोसले यानी पुरस्कारांचे प्रायोजकत्त्व स्वीकारल्याबद्दल केंद्रातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.यानंतरही दरवर्षी भरणा-या साहित्य संमेलनात हा पुरस्कार देण्यात येईल असे कार्याध्यक्ष सतीश लळीत यांनी सांगितले.

4