आडेली मुख्य मार्गावर अनेक झाडे पडल्याने वेंगुर्ला सावंतवाडी रोड बंद

2

चक्रीवादळाचा तडाखा

वेंगुर्ले : ता.११
काल रात्री १० वाजल्या पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्या पावसाने सर्वांची दाणादाण उडविली आहे. यात मद्यरात्री प्रचंड चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. तर आडेली मुख्य मार्गावर अनेक झाडे पडल्याने वेंगुर्ला सावंतवाडी रोड बंद झाला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती मात्र आता ती वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे.
तालुक्यात या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आडेली केळुसकर वाडी ते कुडाळकर वाडीला अनेक वीज खांब, लाईन पडून वीज वितरणाच मोठं नुकसान झाले आहे. तर श्री. विलास होडावडेकर यांच्या घराची कौले उडून त्यांचेही मोठं नुकसान झाले आहे.

3

4