2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नागरिकांची गैरसोय; २७ गावांचा संपर्क तुटला…
माणगाव/मिलिंद धुरी ता.११: कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील आंबेरी गावातील निर्मला नदीला मोठा पूर आला आहे.या नदीवर बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहू लागल्यामुळे नागरिकांना या पुलावरून ये-जा करण्यासाठी गैरसोय होत आहे.
या पुलावर पाणी आल्यामुळे येथील २७ गावांचा एकमेकांपासूनचा संपर्क तुटला आहे.तर या भागात वस्तीला असलेल्या एसटी बस त्याच ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.त्यामुळे सकाळी नोकरीला जाणाऱ्यांची व शाळकरी मुलांची मोठी गैरसोय झाली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4