सावंतवाडीतील घटना;अधिक उपचारासाठी कुटीर रूग्णालयात हलविले…
सावंतवाडी ता.११: आज झालेल्या मुसळधार पावसात येथील गांधी चौक परिसरातील एका इमारतीच्या बांधकामा दरम्यान परात तुटून दोघे कामगार गंभीर जखमी झाले.हा प्रकार आज अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यात सागर घाडगे रा.सांगली हा युवक गंभीर जखमी झाला आहे.तर सुनील जाधव रा.सांगली याला किरकोळ मार बसला आहे.येथील गांधी चौक परिसरात एका इमारतीला प्लास्टर करण्याचे काम सुरू होते दरम्यान आज अचानक आलेल्या पावसामुळे त्या ठीकाणी बांधलेली कमान तुटली यावेळी त्या ठिकाणी काम करत असलेले दोघे कामगार रस्त्यावर खाली कोसळले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.