दोडामार्ग /सुमित दळवी,ता.11
तालुक्यात झालेल्या पावसात आज भेडशी येथील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे उशिरापर्यंत पुलावर पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती
कोकणात सध्या पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे नद्या भरुन वाहतात.सतत पडणा-या मुसळधार पाण्यामुळे तिलारी धरण सुध्दा तुडुंब भरले आहे.
तिलारी दोडामार्ग महामार्गवर भेडशी, झरेबांबर येथील काँजवे पाण्याखाली गेले असुन सगळ्याचीच तारांबळ उडाली आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परतीच्या येण्या-या एस.टी. बसेस खाजगी गाडया पुलावर प्रंचड पाणी असल्याने अडकल्या असुन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बस मध्ये थांबावे लागले आहे.