जिल्हा परिषद शाळा कुडासे वानोशीवाडी यांनी भरवीली “बांधावरची शाळा”…

2

दोडामार्ग/सुमित दळवी ता.१०: जिल्हा परिषद शाळा कुडासे वानोशीवाडी येथील शाळेत बळीराजासाठी एक दिवस अर्थात “बांधावरची शाळा” हा उपक्रम राबविण्यात आला.वानोशी येथील श्री एकनाथ परब यांच्या शेतात ह्या उपक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.यावेळी शिक्षक अजित गेंड, मुख्याध्यापिका प्राची गवस, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत चारी, सदस्य विद्याधर चारी, प्रमोद तळणकर व सर्व उपस्थित विद्यायार्थ्यांनी शेतकामाचा अनुभव घेतला,
यावेळी विजय मेस्त्री यांनी मुलांना शेतीविषयक बहुमोल मार्गदर्शन केले, त्यानंतर जवळच असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायस भेट दिली, यावेळी दिपक नाईक यांचे मार्गदर्शन मुलांना मिळाले, तसेच आपत्कालीन परिस्थिती नदीचा पूर काय असतो तो दाखविण्यात आला. शेवटी शाळेत गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली यावेळी माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश देसाई आवर्जून उपस्थित होते

4