सिंधुदुर्गात जन्म पेक्षा मृत्यूचे प्रमाण जास्त…

223
2
Google search engine
Google search engine
Google search engine

लोकसंख्या दिन पत्रकार परिषदेत संजना सावंत यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता.११:जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर दररोज २३ लाख लोकांची भर पडत आहे. तितक्याच लोकांना एक वेळच्या अन्ना शिवाय उपाशी झोपावे लागत आहे. राज्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची राज्यात ओळख आहे .राज्याच्या तुलनेत येथील जन्मदर हा ९.२ एवढा असून मृत्युदर १०.२ आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे येथील जन्मदारत घट तर मृत्युदरात वाढ होत चालली असल्याचे दिसून येत आहे. साक्षर जिल्हा असल्याने येथील लोकसंख्या नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली.
११ जुलै हा जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, आरोग्य सभापती डाॅ अनिषा दळवी, महिला व बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ, बांधकाम सभापती जेराॅन फर्नांडिस, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदेश कांबळे आदी उपस्थित होते.
संजना सावंत म्हणाल्या, आज जगाची लोकसंख्या ७.६३ अब्जवर पोहचली आहे. लोकसंख्येत दररोज सुमारे २३ लाख लोकांची भर पडत आहे. तेवढ्यात लोकांना एकवेळच्या अन्नाशिवाय उपाशी झोपावे लागत आहे. भारताची लोकसंख्या १३५ कोटी च्या घरात पोचली असून जागतिक लोकसंख्येच्या १७.७४ एवढी आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर येथील लोकसंख्या ही वर्षानुवर्ष घटत चालली असल्याचे दिसून येत आहे. उदाहरण सांगायचे झाल्यास २०११ मध्ये येथील जन्मदर ११.१ एवढा होता. २०१२ मध्ये १०.६८, २०१३ मध्ये १०.२, २०१४ मध्ये ९.९, २०१५ मध्ये ९.८, २०१६ मध्ये ९.५ आणि २०१७ मध्ये ९.२ एवढा आहे. तर २०१८ मध्ये ८.९५ एवढा राहीला आहे. यावरून येथील लोकसंख्येच्या जन्म प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

सिंधुदुर्गात कमी वयात लग्न होण्याचे प्रमाण तीन टक्के
कायद्याने मुलींच्या विवाहाचे वय १८ वर्षे असले तरी आजही मुलींचे विवाह कमी वयात होण्याचे प्रमाण इतर राज्यात जास्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता लग्नाचे सरासरी वय ते २३ वर्ष आहे. तर अठरा वर्षा पेक्षा कमी होणाऱ्या विवाहाचे प्रमाण तीन टक्के आहे. परिणामी मातामृत्यू, कमी वजनाचे अर्भक जन्माला येणे मृत्यू आधी आरोग्य समस्या निर्माण होतात.

लोकसंख्या स्थिरता पंधरावडा
११ ते २४ जुलै २०१८ कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाचे ठिकाणी शस्त्रक्रिया व तांबी बसविणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पात्र जोडप्यांना निरोध व ओरल पिल्स या संतती प्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांमध्ये रोटा व्हायरल लसीचा समावेश
देवी रोगाचे निर्मूलनाबरोबरच पोलिओ रोगाचे निर्मूल अंतिम टप्प्यात असून भारत देश पोलिओ फ्री देश जाहीर झाला आहे. आता नियमित लसीकरणामध्ये गोवर आणि रूबेला साठी एम आर लस, धनुर्वात आणि घटसर्प साठी टिडी लस आणि अतिसार रोखण्यासाठी रोटा व्हायरस लस देण्यात येणार आहे. दरम्यान या लसीमळे नागरिकांवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घेवून ही मोहीम सुरू करावी अशा सूचना आरोग्य सभापती अनिषा दळवी यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांना दिल्या.

आरोग्याच्या योजना सर्वांपर्यत पोहोचवा
सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर असल्यानेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये आघाडी घेतली आहे. जन्मप्रमाणही कमी झाले आहे. माझी योजना भाग्यश्री योजनेमुळे जिल्ह्यात मुलींची संख्या समाधानकारक आहे.

\