कुणाच्या समर्थनार्थ नव्हे तर जनतेसाठीच जेलभरो

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकर; सत्ताधार्‍यांकडुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न…

कणकवली, ता. ११ : महामार्ग चौपदरीकरण दुरावस्थेबाबत सत्ताधार्‍यांचे दुर्लक्ष आणि सत्तेतील मंत्र्यानी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची दिलेली धमकी या विरोधात सिंधुदुर्गातील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत 16 जुलै रोजी जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. हे जेलभरो कुणाच्या समर्थनार्थ नाही. तर जिल्ह्यातील जनतेसाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेने सहभाग घेऊन सत्ताधार्‍यां विरोधातील राग व्यक्त करावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यानी केले आहे.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते. ते म्हणाले, गेली दिडवर्षे जिल्ह्यातील नागरीक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलने करुन विविध प्रश्नांबाबत आवाज उठवित आहेत. मात्र प्रशासनाकडुन आणि सत्त्ताधार्‍यांकरुन कोणतीही दखल घेतली जात नाही. जनतेने निवडुन दिलेले आमदार,खासदार, मंत्री हे अधिकार्‍यांप्रमाणे जनतेची निवेदने घेऊन कारवाई करु अशी आश्वासने देऊन जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. या विरोधात मनसे,काँग्रेस,राष्ट्रवादी व विविध संघटना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील हायवेबाधीत जनता यांचा जेलभरो असुन या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. सदर आंदोलन कुणाच्या समर्थनासाठी नसुन सत्ताधारी हे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विरोधात आंदोलन आहे. सत्ताधारी कशाप्रकारचे कृत्य करतात हे कर्नाटक व गोवा राज्यातील आमदार फुटीतुन दिसुन आले आहे,असे माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले.
सिंधुदुर्गातील जनतेची दिशाभुल करण्याच्या कामे निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी करत असुन जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन मंत्र्यांच्या भेटीतुन प्रश्न सुटल्याचे भासवुन काम करीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सत्ताधारी करत असल्याचा टोला लगावताना परशुराम उपरकर म्हणाले, जे प्रश्न गेल्या साडेचार वर्षापुर्वी होते तेच प्रश्न निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात असुन मंत्र्यांसोबत बैठका घेवुन प्रश्न सोडविल्याच्या केवळ वल्गना केल्या जात असल्याचे यावेळी उपरकर यानी सांगितले.

\