पारकर यांच्या वाढवसानिमित्त 20×20 डबलबारी सामना
कणकवली, ता.११ : जिल्ह्यातील भजनी बुवा,वारकरी सांप्रदायातील तसेच दशावतार कलाकारांनी आपल्या कलेतून जिल्ह्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य होत असताना भक्ती रसाचा आगळा वेगळा आनंद अनुभवायची संधी मिळाल्याचे गौरउद्गार शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेश कामत यांनी काढले.
कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित भालचंद्र संस्थान येथे आयोजित 20×20 डबलबारी जगी सामना व भजनी बुवा,वारकरी सांप्रदायातील तसेच दशावतार कलाकार,पत्रकार यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी युवा नेते संदेश पारकर,विजय केळुसकर,प्रा.दिवाकर मुरकर,प्रसाद अंधारी,संजय राणे,हरीभाऊ भिसे,शशी राणे,भास्कर गावडे आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, वारकरी,भजनीबुवा,पखवाज वादक या भूमीत उदयास आले.अद्याध्यत्मिक व सांस्कृतिक हे वैभव आहे.भजन म्हणजे ईश्वराला साद घालणं मनाला शांती मिळवून आनंदी जीवन जगण्याची कला आहे.या कलाकारांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला आहे.हे भूषन असल्याचे सांगत.ही ओळख कायम रहावी तसेच त्यांना व्यासपीठ मिळावे.व कौतुकाची थाप पाठीवर मारावी यासाठीच 20×20 डबलवारीचे व सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
20×20 चा जंगी सामना बुवा अभिषेख शीरसाट (कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ,हरकुळ बु.कणकवली) व संतोष जोईल (भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी,देवगड) यांच्यात झाला.
या सामान्यांची सुरवात अभिषेख शिरसाट यांनी गण सादर करत केली. तसेच पखवाज वादक शाम तांबे यांनी भालचंद्र महाराज यांच्यावरील अभंग सादर करत सुरेख वादन केले. त्याला रसिक श्रोत्यांनी त्याला विशेष दाद दिली. या डबलबारीला रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
भजनी बुवा,वारकरी सांप्रदायातील तसेच दशावतार कलाकार व पत्रकार क्षेत्रातील योगदाना बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
फोटो- डबलबारी सामन्याचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना सुरेश कामत,संदेश पारकर,विजय केळुसकर,प्रा.दिवाकर आदी