विजेचा धक्का लागून उंबर्डे-वैभववाडी येथे शाळकरी मुलगा ठार…

2

वैभववाडी,ता.१२: विजेचा धक्का बसून उंबर्डे-मेहबूबनगर येथील १५ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरी घडली. शाहीदरजा नियात फरास (१५)असे त्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहीद फरास हा रविवारी सायंकाळी येथील मशिदीत नमाज पडून जवळच असलेल्या मामाच्या घरी काही कामानिमित्त गेला होता. यावेळी मामाच्या घरातील लाईट लावण्यासाठी लोखंडी जिण्यावर चढला, लाईटचे बटन चालू करताना त्याला जोरदार वीजेचा धक्का बसला. तो जिन्यावरून खाली कोसळला. त्याला तातडीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढे हलविण्यास सांगितले. नातेवाईकांनी त्याला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान रात्री १२.३० वा. सुमारास त्याचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाच्या मृत्यूने उंबर्डे गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

440

4