जुन्या शिवसैनिकांची व्यथा: कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी…
सावंतवाडी ता.११: षंड बनण्यापेक्षा गुंड बना अशी शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ मतांवर डोळा ठेवून आपले राजकारण मुळमुळीत ठेवले,असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जुन्या शिवसैनिकांनी केला.नितेश राणेंनी केलेले कृत्य योग्यच आहे,आम्ही त्याचे जाहीर समर्थन करतो,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेंडेकर चिखलफेक प्रकरणात श्री.राणे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ते राज्यात पोहोचले,मात्र पालकमंत्री मतपेटीकडे पाहून मळमळीत राजकारण करत राहिले,त्यामुळे पालकमंत्र्यांची मतपेटी आता खाली होण्याची वेळ आली आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाई देऊलकर,गजानन कुमठेकर,बावतीस फर्नांडिस,गजानन कुमठेकर,जावेद शेख,लक्ष्मण कुडतरकर,सुधीर पराडकर,शैलेश तावडे,संतोष गवस,विलास सावंत,महेश पांचाळ आदी उपस्थित होते.