जागतिक विकासासाठी रोटरी परिवारात सामिल व्हा : रो.गौरीश धोंड*

2

वेंगुर्ले रोटरी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

वेंगुर्ले : ता.११
संपूर्ण जगभर पोलिओ मुक्तीच महान कार्य निष्ठेने व अव्याहतपणे करणारी ‘रोटरी‘ यावर्षी भारतात शतक महोत्सव साजरा करीत आहे. रोटरी म्हणजे विश्वास, रोटरी म्हणजे अतुट मैत्री, रोटरी म्हणजे बदल घडविणारी सामर्थ्यवान ताकद! जागतिक स्तरावर पोलिओच भयंकर असणार आव्हान याच रोटरीने समुळ उच्चाटन केले आहे. रोटरी ही जागतिक आरोग्य, शिक्षण,पर्यावरण, शांतता, समृद्धीसाठी अविरत झटणारी संस्था आहे. त्यामुळे सर्वांनी रोटरी परिवारात सामिल होऊन जागतिक विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन भावी प्रांतपाल डिस्ट्रीक्ट ३१७० रो.गौरीश धोंड यांनी वेंगुर्लेत केले.
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ १० जुलै रोजी साई मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपिठावर भावी प्रांतपाल डिस्ट्रीक्ट ३१७० रो.गौरीश धोंड, नगराध्यक्ष दिलीप गिरप, नुतन प्रेसिडेंट रो. राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर वसंत करंदीकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे, माजी अध्यक्ष डॉ. आनंद बांदेकर आदी उपस्थित होते. पदग्रहण अधिकारी रो.गौरीश धोंड यांनी नुतन प्रेसिडेंट राजेश घाटवळ व कार्यकारिणीला नविन रोटरी वर्षाची सूत्र प्रदान केली. यावेळी ‘वेंगुर्ल्याची गाज‘ या रोटरी मुखपत्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रोटरी सदस्य व रोटरी पाल्यांचा त्यांच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल तसेच डिस्ट्रिक्ट ऑफीसर दिलीप गिरप, संजय पुनाळेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वामिनी महिला बचत गट (दाभोसवाडा), वेताळ प्रतिष्ठान (तुळस), गमक (वेंगुर्ला) व माझा वेंगुर्ला या संस्थांचा व सदस्यांचा मानपट्टा, सन्मानचिन्ह देऊन‘रोटरी सन्मान‘ करण्यात आला. दहा महिलांचा स्वामिनी महिला बचत गट मांडवी खाडीत कांदळवन सफर घडविते. तसेच कांदळवन, पक्षी,प्राणी, शंखशिपले यांची माहिती देते. कांदळवन जतन संवर्धन करण्याच्या मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी ‘कांदळवन शिक्षण व जतन‘ हा प्रकल्प रोटरीतर्फे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कांदळवनांची माहिती पुस्तिका रो. गौरीश धोंड यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या नविन दहा सदस्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कुडाळ रोटरी क्लबचे गजानन कांदळगांवकर, मुख्याधिकारी वैभव साबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रोटरी वेंगुर्ला नुतन टीमला म्हापसा क्लब प्रेसिडेंट अमोल बर्वे, कुडाळ प्रेसिडेंट एकनाथ पिगुळकर, कणकवली प्रेसिडेंट दिशा अंधारी, सावंतवाडी प्रेसिडेंट सुनिल नाईक, रोटरी डिस्ट्रिक ऑफीसर भालचंद्र दिक्षित, रविद्र म्हापसेकर, संतोष कांबळे, अॅड. दिपक अंधारी, इरनव्हील अध्यक्षा वृंदा गवंडळकर, वेंगुर्ला कॅम्प रोटरॅक्ट क्लबचे चेतन जाधव व सदस्य, सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंटरॅक्ट क्लब यांनी शुभेच्छा दिल्या. नुतन अध्यक्ष राजेश घाटवळ यांनी वेंगुर्ला मिडटाऊन क्लबला सोबत घेऊन एक डोनर व व्हायब्रट क्लब निर्मितीसाठी सांघिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जाहिर केले. तर वेंगुर्ला रोटरी क्लबला नगरपरिषदेचे सहकार्य राहिल असे आश्वासन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.आनंद बांदेकर, सूत्रसंचालन संजय पुनाळेकर व प्रशांत आपटे यांनी तर आभार जॉईंट सेक्रेटरी प्रा.प्रकाश शिदे यांनी मानले.

17

4