फणसाचे गरे खाल्ल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

2

फणसगाव येथील घटना;पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद…

कणकवली, ता.11 : फणसाचे गरे खाल्ल्याने तीन महिन्याच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना फणसगाव (ता.देवगड) येथे घडली आहे. साक्षी संदीप नारकर (वय 32) असे त्या विवाहितेचे नाव आहे. काल रात्री नऊच्या सुमारास तिने फणसाचे गरे खाल्ले होते. त्यानंतर तिच्या पोटात त्रास जाणवू लागल्याने तिला तातडीने तळेरे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची तब्येत खूपच बिघडल्याने मध्यरात्री कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे अडीचच्या सुमारास साक्षी नारकर हिचा मृत्यू झाला. साक्षी यांचा 11 वर्षापूर्वी विवाह झाला असून पश्‍चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. पोलिसांनी पंचनामा करून साक्षीचा मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याघटनेची खबर संदीप नारकर याने येथील पोलिसांत दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास विजयदुर्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

13

4