Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानगर विकास अभियंताच बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पाठीशी घालतात... अधिकारी शासनाच्या...

नगर विकास अभियंताच बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पाठीशी घालतात… अधिकारी शासनाच्या की बिल्डरांच्या सेवेसाठी ; आचरेकर- वराडकर यांचा सवाल…

मालवण, ता. ११ : शहरात बेकायदेशीर कामे करणाऱ्या बिल्डरांना नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील नगर विकास अभियंता पाठीशी घालत आहे. एखादा गरीब मातीच्या घराची दुरुस्ती करत असल्यास त्याला चोवीस तासात बांधकाम काढण्याची नोटीस हाच अधिकारी बजावत आहे. त्यामुळे हे अधिकारी शासनाच्या की बिल्डरांच्या सेवेसाठी? असा प्रश्‍न माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी उपस्थित करताना संबंधित अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरपरिषदेच्या विशेष सभेत केली.
दरम्यान नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नगरपरिषदेच्या मागील अनेक सभांमध्ये बिल्डरांबाबत तक्रारी होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. तसेच चुकीच्या पद्धतीने कार्यवाही करणार्‍या अधिकार्‍याला योग्य ती समज द्यावी अशा सूचना त्यांनी मुख्याधिकारी रंजना गगे यांना दिल्या.
नागरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन २०१८- १९ या वर्षातील तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चाला मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील नगरपरिषद मालकीच्या जागेत खेळणी बसविण्यास मान्यता देण्यात आली. अग्निशमन वाहन आणि सक्शन वाहन दुरुस्तीलाही काही सूचना देत सभागृहाने मान्यता दिली.
बांधकाम विभागाचे नगर विकास अभियंता हे नेहमीच भ्रमणध्वनीवर व्यस्त असतात. त्यांच्याकडून कार्यालयात कोणतेही काम योग्यप्रकारे होत नसल्याचे दिसून येते. नगरसेवकांच्या लेखी तक्रारीवर कार्यवाही होत नाही. काही कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगसाठी सोडलेल्या जागेत बांधकामे करून कार्यालये थाटण्यात आली आहेत त्यावरही कारवाई नाही. चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याचा अहवाल असतानाही संबंधितांना अभय दिले जात आहे. नगरसेवक बांधकामांविरोधात आवाज उठवीत असल्याने त्यांच्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्या जात आहेत. मात्र आम्ही अशा तक्रारींना भीक घालत नाही. आमच्याकडे बेकायदेशीर बांधकामांचे पुरावे आहेत, नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी कारवाई न केल्यास आम्ही नगरविकासच्या आयुक्तांकडे दाद मागू असे श्री. आचरेकर यांनी प्रशासनास सुनावले. यावर नगराध्यक्षांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत बेकायदेशीर कामाबाबत बीट निरीक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
भुयारी गटार योजनेला पुन्हा एकदा सहा महिन्याची मुदतवाढ सभागृहाने दिली. सहा महिन्यांच्या मुदतीत संबंधित ठेकेदाराकडून नगरपरिषदेसोबत काम कशाप्रकारे पूर्ण करणार याचा करार करावा.
शहरातील बंदावस्थेतील पथदिव्यांबाबत पूजा करलकर, राजन वराडकर, नितीन वाळके, गणेश कुशे, यतीन खोत यांनी नाराजी व्यक्त केली. पथदिव्यांची कामे सोपविलेल्या एजन्सीकडून कामे होत नसल्याने संबंधित विभागाच्या अधिकार्‍याला धारेवर धरले. नितीन वाळके यांनी शहरात एलईडी दिवे वीज बिल कमी करण्यास बसविले होते. प्रत्यक्षात वीज बिले वाढीवच येत असल्याने याची सविस्तर माहिती घ्यावी अशी मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments