आंबोलीत दरडीचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत…

176
2

घाटाची सुरक्षा एका रस्ता कामगारावर देवून अधिकारी मात्र सुशेगाद…

आंबोली ता.११: आज झालेल्या मुसळधार पावसात आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडीचा काही भाग कोसळला तर एका ठिकाणी झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.परंतु पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान घाट धोकादायक असताना घाटाची सुरक्षा एक्का रस्ता कामगारावर सोडून बांधकाम विभागाचे अधिकारी सु शिकत असल्यामुळे त्यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे तर त्याठिकाणी घाटात जेसीबी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे आज पुन्हा एकदा दुपारी घाटात दोन ठिकाणी दरडीची काही दगड कोसळले होते त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी पर्यटक व ग्रामस्थां ची मदत घेऊन हे दगड बाजूला केले झालेल्या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याच्या विरोधात उपस्थित पर्यटक व ग्रामस्थांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे

4