कुडाळ-कुंभारवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे हरिनाम सप्ताह साजरा

2

कुडाळ, ता. १२ : आषाढी एकादशी निमित्त जि.प. प्रा. शाळा कुडाळ कुंभारवाडाच्या विद्यार्थ्यांची वारी हनुमान मंदिरातील हरिनाम सप्ताहात सहभागी झाली. याप्रसंगी प्रशाला मुख्या. स्वप्नाली सावंत, शाळा व्य. समिती अध्यक्ष सौ. स्नेहा मसुरकर, उपाध्यक्ष संजय कुंभार, नगरसेवक गणेश भोगटे, शा. व्य. सदस्य तुकाराम राऊळ, अनंत खटावकर, पालक, ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख, वारीचा परिचय व स्थानिक कार्यक्रमात सहभाग याचबरोबर अभंग गायन, टाळांचा निनाद व तालबद्ध नृत्य, लेझिम पथक, वेशभूषा अशाप्रकारे कला, कार्या, शा. शि. सर्वच विषयांना पूरक असा स्तुत्य व आनंददायी उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये सौजन्य शीलता, स्त्री पुरुष समानता, र्सवधर्मसमभाव ही मूल्ये तसेच भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा, समता, स्त्री पुरुष समानता हे गाभाघटक रुजविण्यात आले. मारूती देवस्थान कमिटी बाजारपेठ कुडाळ यांचेही उत्तम सहकार्य लाभले. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

9

4