डॉ. संजय सामंत : हिंदू धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न सुरू
सावंतवाडी, ता. १२ : सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्यावतीने देशात 112 ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा पाच ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती समितीचे पदाधिकारी डॉ. संजय सामंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
समितीच्यावतीने 16 जुलैला जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली, देवगड, कुडाळ आणि मालवण या ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्म स्थापनेसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, हा संदेश या ठिकाणी देण्यात येणार आहे. गुरूचे महत्व जीवनात फार मोठे आहे ही शिकवणसुद्धा यावेळी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संदेश गावडे, सत्यवान कदम, राजेंद्र पाटील, संतोष परब आदी साधक उपस्थित होते.