सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात

344
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१२: येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सकाळपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. तर भर पावसात रांगेत उभे राहुन भाविकांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.
सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सकाळच्या सत्रात सद्गुरु संगीत विद्यालयाचा सुश्राव्य संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.तर सायंकाळी भजन व कीर्तन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.यावेळी विनायक मसुरकर,नंदू शिरोडकर,रमेश बोंद्रे,देवेंद्र नाईक,अशोक पेडणेकर,मंगेश तळवणेकर,राजू सावंत,बाळा बोर्डेकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\