भुईबावडा घाटात पडझड सुरूच!

256
2

अणुस्कुरा घाट कोसळला; भुईबावडा मार्गे वाहतूक सुरू

वैभववाडी, ता. १२ : सिंधुदुर्गात गुरुवारी सकाळपासूनच पावसाने थैमान घातले. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर दोन ठिकाणी दरडी गटारीत आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघात होण्याची दाट संभवना आहे. तर अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूर राजापूर मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
गुरूवारी सकाळपासूनच धुवाधार कोसळणा-या पावसाने अक्षरशः जनजिवन विस्कळीत केले होते. नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. तर अनेक कॉजवे पाण्याखाली गेले होते. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर दोन ठिकाणी गटारात दरडी आल्या आहेत. त्यामुळे गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने रस्ता चिखलय बनला आहे. याठिकाणी घसरुन अपघात होण्याची दाट संभवना आहे. तर अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूर राजापूर मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला आहे

4