सिंधुदुर्गनगरी, ता. १२ : जिल्ह्यातील शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, पावशी, पुळास, हरकुळ, ओझरम आणि लोरे लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पातून 15.16 घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यातील सनमटेंब लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये 95.82 टक्के पाणीसाठा झाला आहे. आंबोली प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 122 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 66.82 टक्के पाणीसाठा झाला असून सध्या या धरणामध्ये 298.9500 द.ल.घ.मी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 109 मि.मी पाऊस झाला असून 1 जून 2019 पासून आजपर्यंत एकूण 1721.60 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 58.44 टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. तिलारी नदीची पाणी पातळी 39.500मीटर इतकी असून कर्ली नदीने 5.000 मीटर पातळी गाठली आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पाणीपातळी 5.700 मीटर इतकी झाली आहे.