Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकारिवडे आप्पासाहेब पटवर्धन विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

कारिवडे आप्पासाहेब पटवर्धन विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सावंतवाडी, ता. १२ : कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाने गेले वीस वर्ष विनाअनुदानित तत्त्वावर ज्ञानदान करून विद्यार्थी घडविले. ही शाळा खऱ्या अर्थाने आदर्श अशी शाळा आहे. या शाळेला सर्वतोपरी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. या शाळेला मुलींचे सौचालय बांधून देण्यात येईल, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.

कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीच्या मुलांना गणवेश वाटप कार्यक्रम करण्यात आला. श्री. परब यांच्या सहकार्याने या शाळेतील मुलांना गणवेश देण्यात आले. गणवेश वितरण सोहळ्याच्यावेळी व्यासपीठावर सरपंच अपर्णा तळवणेकर, उपसरपंच अलेक्स गोम्स, माजी सरपंच नितीन गावडे, ज्येष्ठ गावकर दादा गावकर, पोस्टमन गोपाळ जाधव, अर्जुन सडवेलकर, मिलन सावंत, रवींद्र पराब. संतोष जाधव, सह्याद्री फाऊंडेशनचे सचिव एडवोकेट संतोष सावंत आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अर्चना सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, या गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे व दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळेच आम्ही गेली वीस वर्ष विनाअनुदानित तत्त्वावर शाळेतील भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना देऊ शकलो. येथील पालकांचे सहकार्य नेहमीच लाभत आहे. ह्या शाळेत शिकलेली मुले शहरी भागातील मुलांपेक्षा टक्केवारीत पुढे आहेत. त्यामुळे आमच्या शाळेला संजू परब दानशूरपणा दाखवून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले असेच सहकार्य ठेवावे. त्यांच्या दातृत्व मुलांना प्रेरणादायी ठरेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. परब पुढे म्हणाले, शहरी भागापेक्षा कारिवडे शाळा अनेक संकटावर मात करत विद्यार्थी घडवत आहेत. हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचा आदर्श जिल्ह्यातील शिक्षकांनी घेण्यासारखा आहे. या शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. मुलींसाठी शौचालय उभारण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी सरपंच तळवणेकर म्हणाल्या, ह्या शाळेला सहकार्याची साथ श्री. परब यांनी देऊन चांगले कार्य केले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून माध्यमातून शाळेला सहकार्य करण्यात येईल. यावेळी सूत्रसंचालन प्रभाकर उदार, आभार एकनाथ जाधव यांनी मानले. या मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments