सावंतवाडी रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शनची एैसी कि तैसी

227
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉक्टरांचीच मानसिकताच नाही : रुग्णांना मात्र नाहक मनस्ताप

 

सावंतवाडी, ता. १२ : येथील कुटीर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकार्‍यांकडून झिरो प्रिस्क्रिप्शनची सेवा धाब्यावर बसविली जात असल्याचा प्रकार आज उघड झाला. खुद्द अधिकार्‍यांनी आमच्याकडे औषधे आहेत, मात्र सुचना देऊनसुद्धा प्रशासन ते देत नाहीत असे मान्य केले.
दरम्यान येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत हा प्रकार उघड केला. रुग्णांना आवश्यक सुविधा द्या, अन्यथा जाणिवपूर्वक त्रास दिला गेल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
सावंतवाडी कुटीर रुग्णालयात गेले काही दिवस प्रसृत स्त्रियांना प्रसुतीनंतर आवश्यक असलेली औषधे, इंजेक्शन तसेच अन्य साहित्य बाहेरून आणण्याबाबत प्रिस्क्रिप्शन दिले जाते याबाबतची माहिती मिळाल्यानंतर श्री. केसरकर यांनी आज आपले सहकारी दादा मालवणकर, आशिष सुभेदार, अतुल केसरकर यांच्यासह जावून रुग्णालयात रुग्णांशी चर्चा केली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या बाळंतिणीनी आपल्या प्रसुतीनंतर बाहेरची औषधे लिहून देण्यात आली असे सांगितले. याबाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतर श्री. केसरकर यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उत्तम पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी कालच झालेल्या बैठकित आपण तशा प्रकारच्या सुचना दिल्या आहेत. यापूर्वीही वेळोवेळी सुचना दिल्या होत्या. मात्र ड्युटीवर असलेले वैद्यकिय अधिकारी तसे वागत नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. यापुढे आपण तशा सुचना पुन्हा देऊ. सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांचे नुकसान होऊ देणार नाही असे सांगितले. यावेळी असा प्रकार पुन्हा घडल्यास नाईलाजाने आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा श्री. केसरकर यांनी दिला.
65 हजार सुया पडून
यावेळी एक धक्कादायक माहिती उघड झाली. रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना सर्रास बाहेरून सुया, औषधे आणायला सांगितले जाते, याबाबत विचारले असता त्या ठिकाणी असणार्‍या कर्मचार्‍याने आमच्याकडे तब्बल 65 हजार सुया पडून आहेत. वैद्यकिय अधिकार्‍यांच्या मागणीनुसार आम्ही देतो. परंतू मागणी येतच नाही अशी माहिती दिली.

\