Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल बनले भक्तिमय
- वेंगुर्ले, ता.१२: आषाढी एकादशी निमित्त आज प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्लेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेसह ग्रंथ दिंडी काढली. या ग्रंथ दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, वारकरी, यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातून ग्यानबा तुकाराम, विठुचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माउली तूकाराम च्या गजरात या दिंडीला सुरवात झाली. खर्डेकर महाविद्यालय, हॉस्पिटल नाका, शाळा नं. ३ येथून पुन्हा एम. आर. देसाई स्कूल येथे या दिंडीची सांगता झाली. “वाचन केल्याने मिळते ज्ञान, दूर पळते आपले अज्ञान” अशा आशयाचा संदेश देत विद्यर्थ्यांनी आषाढी एकादशीची दिंडी साजरी केली. या ग्रंथ दिंडीत शाळेचे सर्व शिक्षक, विद्यर्थ्यांचे पालक सहभागी झाले होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.