पोलिसांसमक्ष पंचाना झालेल्या मारहाणीचा खासदार राऊत यांच्याकडून निषेध

2

उद्या पोलीस अधीक्षकांची घेणार भेट: पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी

सावंतवाडी, ता.१२: आंबेगाव येथे दारू विक्रीची माहिती देणाऱ्या पंचाना पोलिसांसमक्ष झालेल्या मारहाणीचा खासदार विनायक राऊत यांनी निषेध केला आहे. दरम्यान सिंधुदुर्गातील असामाजिक तत्वांना कायद्याचा धाक राहिला नाही अशी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान उद्या शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता श्री. राऊत हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेणार आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
तालुक्यातील आंबेगाव येथे काही दिवसांपूर्वी पोलिसांना मदत करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना बेकायदा दारुधंदा करणार्‍या गुंडांनी पोलिसांसमक्ष मारहाण केली असल्याचे समजते. पोलिसांसमक्ष त्यांना मदत करायला गेलेल्या लोकांना जर दारु धंदेवाले अशाप्रकारे मारहाण करीत असतील. तसेच यात पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असतील व त्यानंतर तीन दिवस उलटूनसुद्धा जर त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसेल ही बाब निषेधार्य आहे. आपल्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या संपूर्ण सिंधुदुर्ग पोलिस दलासाठी शरमेची आहे. मी या घटनेचा निषेध करतो. सध्या देशाच्या संसदेचे कामकाज सुरू आहे. तरीपण ही बाब अतिशय गंभीर आहे.

4

4