महिलांसाठी योगा शिबिराचे आयोजन…

130
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१२ : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त एच.पी.सी.एल.हॉल मध्ये १४ जुलै रोजी संध्याकाळी ४ते ५.३० वा.पर्यंत महिलांसाठी योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संदेश पारकर यांच्या वाढवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांसाठी आयोजित या योगशिबिरात योग तज्ञ डॉ साधना गुरव या मार्गदर्शन करणार आहेत.तर सुवेचा गुरव या योगा शिकवणार आहेत.तसेच शहरातील जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या शिबिरात सहभागी होण्यासाठी नगरसेविका सुमेधा अंधारी मो.7588896603, मेघा सावंत मो.9860329039 यांच्याशी संपर्क साधावा.व जास्ती जास्त महिलांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन संदेश पारकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

\