कृषी दूतांकडून कृषिदिन सोहळा उत्साहात साजरा

2

सिंधुदुर्गनगरी ता.१२:
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथील कृषिदूतांनी कणकवली तालुक्यातील पियाळी गावामध्ये कृषिदिन सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी वृक्षारोपण तसेच कृषिदिंडी देखील काढण्यात आली.
कै.वसंतराव नाईक” यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये “कृषिदिन” म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून 1 जुलै रोजी पियाळी येथील प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत पियाळी येथे कृषिदिन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी सरपंच पवित्रा गुरव, उपसरपंच, बाळकृष्ण सावंत, मुख्याध्यापिका अमृता मुद्राळे ,इतर शिक्षक वर्ग तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
ओरोस कृषी महाविद्यालयातील कृषिदूत विक्रम पवार, संदिप राऊत, प्रदिप रोपळे, संग्राम साळोखे, रिजवान शेख, सादिक शेख यांनी शाळेत वृक्ष वाटप करत गावात कृषीदिंडी काढत जनजागृती केली.

0

4