दिल्लीत नाबार्ड “फाउंडेशनडेला” सतिश सावंत यांची परिसंवादात उपस्थिती
नाबार्ड अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून समस्या बाबत निवेदन सादर
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकांच्या अडीअडचणी तसेच डेअरी उद्योग, शेळीमेंढी पालन, फळप्रक्रिया व्यवसाय, मच्छिमार यांना आपल्या उद्योग धंद्यासाठी नाबार्डने कमी व्याजदराने अर्थ साहाय्य करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी शुक्रवारी नाबार्ड अध्यक्ष हर्ष भानवाला यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. यावेळी त्यांना समस्या बाबत निवेदन सादर केले. याबाबत सकारत्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नाबार्ड अध्यक्षांनी सतिश सावंत यांना दिले.
ग्रामिण भागातील युवक व त्यांना रोजगाराची संधी हा विषय घेऊन नाबार्डने आपल्या स्थापने दिवशी दिल्ली येथे केंद्रीय अर्थराज्य मंत्री श्री.अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन शुक्रवारी १२ जुलै २०१९ रोजी केले होते. या परिसंवादात भाग घेण्यासाठी नाबार्डकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांना निमंत्रीत केले होते. महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग, अकोला, रायगड या तीन जिल्हा बँकांच्या अध्यक्षांना या परिसंवादासाठी निमंत्रित करण्यात आले होते. बँकेेचे अध्यश सतिश सावंत व बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे परिसंवादासाठी उपस्थित होते. या परिसंवादात भाग घेऊन आपले विचार मांडण्याची संधी देशभरातील निवडक बँकांच्या अध्यशांना देण्यात आली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश होता. हि बाब या जिल्हा बँकेला व जिल्हावासीयांना अभिमानास्पद आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी या परिसंवादात भाग घे आपले विचार मांडले. जिल्हा बँकांच्या अडीअडचणी तसेच बेरोजगारांसाठी डेअरी उद्योग अंतर्गत कोंकणा सारख्या डोंगराळ व मागास भागासाठी डेअरी उद्योगासाठी विशेष अर्थसाहाय्य उपलब्द व्हावे . कोकण भागाचा विचार करता ग्रामीण गोदाम योजने अंतर्गत मोठ्या
गोडावून ऐवजी १०० ते २०० मे . टन गोडावून उभारणीसाठी नाबार्ड कडून अनुदानाची जिल्हावार विभागणी करून सदर योजना राबवावी. कोंकणात मोठ्या प्रमाणावर मच्छिमारांची संख्या असून शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा व्हावा . काजू प्रक्रिया युनिटना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा व्हावा. जिल्हा बँकांना घरकर्जाची मंजुरी ३० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढवून मिळावी. प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरणाच्या द्रुष्टीने त्यांचे संगणीकरण लवकरात लवकर होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशा अनेक समस्या बाबत नाबार्ड अध्यक्ष हर्ष भानवाला यांच्याशी सतिश सावंत यांनी चर्चा केली व त्यांना समस्या बाबत निवेदन सादर केले. याबाबत सकारत्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नाबार्ड अध्यक्षांनी सतिश सावंत यांना दिले आहे.