बांधावरच्या शाळेतून वेंगुर्ले शाळा नं. ४ च्या मुलांनी घेतले कृषिचे ज्ञान

197
2

वेंगुर्ले, ता. १२ : बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत वेंगुर्ले शहरातील शाळा नं. ४ च्या विद्यार्थ्यांनी बांधावरच्या शाळेतून शेती बरोबरच कृषिचेही ज्ञान घेतले. यामुळे मुलांच्या मनात शेतीविषय प्रेम निर्माण झाले आहे.
आंबा, काजू, नारळ, भातशेती, सुपारी लागवड कशी करावी, त्यांची निगा कशी राखावी, कोणत्या हंगामात जास्त काळजी घ्यावी लागते, शेती विषयक विविध यंत्रसामग्री कोणती, त्यापासून शेतकयांना कोणत्याप्रकारे फायदा होतो आदी माहिती या मुलांना श्री. धनंजय गोळम यांनी दिली. तसेच मुलांना प्रत्यक्ष शेतीमध्ये, नर्सरीमध्ये नेऊन त्या ठिकाणी भात लावणी कशी करतात, नांगरणे म्हणजे काय, मातीमधून भात कसे उगवते याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, मुख्याध्यापक संध्या बेहरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुदेव परब, उपाध्यक्षा साक्षी वेंगुर्लेकर, नर्सरिचे मालक श्री. येरम, शिक्षक संतोष परब, लीना नाईक, संतोष बोडके, राजू वजराटकर यांसह ग्रामस्थ पालक उपस्थित होते. आपला देश कृषिप्रधान असल्याने आत्तापासूनच विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून अशा प्रकारे शेतीचे बाळकडू मिळणे आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान वेंगुर्ले तालुक्यात अशा प्रकारे प्रत्येक प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबऊन मुलांच्या मनात शेतीविषय प्रेम निर्माण करण्यात आले आहे.

4