नवोपक्रम लेखन स्पर्धेत अनिष्का कदम जिल्ह्यात प्रथम… राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

2

मालवण, ता. १२ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम लेखन स्पर्धेत माध्यमिक विद्यालय बिळवस येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
सौ. कदम या उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यावर्षी इंग्रजी विषयातील ‘इनोव्हेटरी डेव्हलप अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्ट स्ट्रक्चर ऑफ अ‍ॅडजेक्टिव्ह अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हर्ब इन स्टुडंट सेव्हन्थ’ या समस्येवर संशोधन करून राज्यस्तरावर नवोपक्रम सादर केला होता. त्या संशोधनास जिल्हास्तरीय परीक्षणात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
सौ. कदम यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ठाकूर, संस्थाध्यक्ष श्री. पालव तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

74

4