चार स्मार्टफोनसह नऊ हजार रुपयांची रोकड लंपास…
सावंतवाडी ता.१२: शहरात राहणाऱ्या सात परप्रांतीय कामगारांना अज्ञाताने गंडा घातल्याची घटना घडली आहे.यात त्याच्या कडून ४ स्मार्टफोनसह ९ हजार रुपये रोकड असा सुमारे ६० हजाराचा मुद्देमाल लाबविण्यात आला आहे.हा प्रकार काल रात्री उशिरा घडला.याबाबत आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात संबंधित युवकाने धाव घेतली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की,काल बिल्डिंगच्या कन्ट्रक्शनचे काम सुरू असताना परांची तुटल्या खाली पडून जखमी झालेल्या आपल्या मित्रांसोबत संबंधित युवक रुग्णालयात होते.दरम्यान रात्री उशिरा १ वाजण्याच्या सुमारास कन्ट्रक्शन काम सुरू असलेल्या ठिकाणी रूम मध्ये येऊन झोपले होते.यावेळी अज्ञाताने संधी साधत मुद्देमाल लंपास केला आहे,असे त्यांनी सांगितले.दरम्यान बाजूच्या खोलीत राहत असणाऱ्या बिहारी कामगारांची पोलिसांनी झडती घेतली,मात्र त्यांना काहीच मुद्देमाल हाती लागला नाही.याबाबत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.